काम करताना आपण विविध ढबीत बसून बघावे व त्यानंतर ठरवावे की, नेमक्या कोणत्या ढबीत बसल्यावर आपला देह हा अवघडला जात नाही.
पाठीस पोक न काढणे, अंधारात काम न करणे, खूप पूढे वाकून बसून काम न करणे, पायावर पाय टाकून न बसणे, जर काँप्युटरवर काम करताना ऍडजेस्टेबल खुर्चीचा वापर करावा.
आपण काम करताना ज्या खूर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी.
आपल्या कंबरेस जर आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.
जर लघवीस लागली, तर शक्यतो ती दाबून ठेवू नये, कारण यामुळे देखील काही अपाय होऊ शकतो.
जेवण गरम राहील अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही डाळ इ. समावेश असावा.
काँप्युटरवर वा टाइपरायटरवर काम करणार्या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसून देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाइप करावे.
जेव्हा बसाल, तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटर्या यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील, असे काम करावे.
नोकरी करणार्या स्त्रियांच्या आरोग्य व सौंदर्य यावर घाला घालणाऱ्या मायग्रेन, कंबर, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर यासारख्या अनेक विकरांची कारणे यात असतात आणि यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच वरील बऱ्याच सूचना विचारात घ्याव्यात.
0 Comments