सर्वच स्त्रीयांना रजोनिवृत्तीकाल या संक्रमणातून जवेच लागते.कधी कधी हा काळ काही वर्षापर्यंत लांबू शकतो तर काहींसाठी तो एकदम संपतो. काही जणींना त्याचा काहीच त्रास होत नाही तर काहींना रात्री खूप घाम येणे, मूडी होणे अशी त्रासाची लक्षणं दिसायला लागतात . पौष्टिक आहाराने या काळात होणारा त्रास कमी होऊ शकतो. आणि यासाठी खाली काही सल्ले दिले आहेत.


१. जेवणामध्ये ‘ सोया’ चा वापर करा. त्यामध्ये फायटो एस्ट्रोजन किंवा प्लॅन्ट एस्ट्रोजन असते.
त्वरीत उपयोग:- यानं रात्री घाम येतो, मूड बदलणे, हॉट फ्लशेस कमी होतात.
इतर उपयोग :- रक्तातील कॅलोस्ट्रॉल कमी ठेवायला मदत होते, त्यामुळे हृदयाचे विकार कमी होतात, व हाडांमध्यल्या धातुंची घनता वाढते, ज्यानुळे ऑस्टोपोरोसिस या रोगापासून संरक्षण मिळते



सोया किती प्रमाणात घ्यावे?
रोजच्या आहारात साधारण ९० मिलीग्रॅम सोया आहारा मध्ये असला पाहिजे. सोया मिल्क (एका सरव्हिंग मध्ये ३० मिलीग्रॅम किंवा सोया चे पनीर, बारीक केलेला सोया या द्वारे सोया आहारात आणू शकतात).



२. कॅल्शीयमचे प्रमाण वाढवा, त्यामुळे हाडं मजबूत होतात.
त्वरीत उपयोग :- हाडं मजबूत होतात.
इतर उपयोग :- मेनोपॉज नंतर कंबरेच्या हाडांना इजा व्हायची शक्यता असते, ती शक्यता कॅल्शीयम वाढवल्यामुळे कमी होते.



कॅल्शीयम किती प्रमाणात घ्यावे?
६५ वर्षाखाली मेनोपॉज सुरू असलेल्या स्त्रियांना ज्या एच. आर. टी सुरू असल्यास- १००० मिलीग्रॅम दिवसाला.
६५ वर्षांखालील मेनोपॉज सुरू असलेल्या स्त्रियांना ज्या एच. आर. टी घेत नाहीत - १५०० मिलीग्रॅम दिवसाला.
६५ वर्षां वरील सर्व स्त्रियांना - १५०० मिलीग्रॅम दिवसाला.



३. फोलेट वाढवा
त्वरीत उपयोग :- त्यामुळे हृदयाचे रोग वाढवणाऱ्या homocysteines चे प्रमाणे कमी करते.
इतर उपयोत :- मेनोपॉज नंतर हृदयाचे रोग होण्याची शक्यता कमी होते.
फोलेट किती प्रमाणात घ्यावे:- दिवसाला ४०० मायक्रो ग्रॅम विटामिन बी फ्लोएट घ्यावे.



४. वजन योग्य प्रमाणात ठेवा
त्वरीत उपयोग :- वजन कमी ठेवले की हृदयाचे रोग होण्याची शक्यता कमी होते.
इतर उपयोग :- मेनोपॉज नंतर सुध्दा हा त्रास होण्याची शक्यता कमी होते.



५. बोरोन व फायबर्स असलेले अन्न खावे.
त्वरीर उपयोग :- बोरॉनमुळे शरीरातले एस्ट्रोजन कायम राहते, जे मेनोपॉज च्या वेळेस कमी होण्याची शक्यता असते.
इतर उपयोग :- फायबर नी कोलेस्ट्रोल कमी होते.
बोरॉन व फायबर किती प्रमाणात घ्यावे :- २०-३० ग्रॅम दिवसाला फायबर खाल्ले पाहिजे. तुम्हाला फायबर व बोरॉन सफरचंद, बीनस्‌, कोबी , स्ट्रॉबेरी, टोमॅटो, या फळातून व भाज्यातून मिळतं. वात कमी होतो.